गुजरात निवडणूक २०२२ : समान नागरी कायदा, 20 लाख नोकऱ्या; भाजपचे संकल्पपत्र जाहीर

गुजरात निवडणूक २०२२ : समान नागरी कायदा, 20 लाख नोकऱ्या; भाजपचे संकल्पपत्र जाहीर
Published on
Updated on

गांधीनगर; वृत्तसंस्था :  गुजरात निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रकाशित केला असून, त्यात २० लाख नोकऱ्या, समान नागरी कायदा लागू करणार, १ लाख महिलांना शासकीय नोकऱ्या, 'एम्स'सारख्या सुविधांची निर्मिती आदी आश्वासने देण्यात आली आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी शनिवारी गांधीनगर येथे भाजपचा संकल्पपत्र नावाने जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी बोलताना नड्डा यांनी गुजरात ही परिवर्तन करणाऱ्यांची भूमी आहे, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातपासून सुरू झालेल्या राजकीय प्रवासाचा आवर्जून उल्लेख केला.

गुजरातला विदेशी गुंतवणुकीचे केंद्र बनवण्याचा भाजपचा निर्धार असून, त्या माध्यमातून गुजरातची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सची होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतविरोधी शक्ती विधानसभा आणि दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल शोधून नेस्तनाबूत करणे आणि कट्टरवादाला आळा घालण्यासाठी विशेष सेलची स्थापना केली असल्याचेही ते म्हणाले. जाणार मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, संकल्पपत्रात नमूद करण्यात आलेले मुद्दे म्हणजे पोकळ आश्वासने नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाबाबत जे धोरण आहे त्याबाबतची वचनबद्धता आहे. पूर्ण करता येतील अशीच आश्वासने आपण दिल्याचे ते म्हणाले. मागील दोन दशके गुजरातच्या जनतेने भाजपवर जो विश्वास दाखवला, प्रेम दिले ते भारावून टाकणारे असून, गुजराती जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, याचा त्यांनी पुनरुच्चार १८२ सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होत आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे..

      भाजपचे संकल्प…

  •  समान नागरी कायदा लागू करणार
  •  २० लाख रोजगारांची निर्मिती
  • १ लाख महिलांना नोकऱ्या
  • कृषी विपणन यंत्रणेसाठी १० हजार कोटी रुपये
  •  समुद्रकेंद्रित उद्योगांसाठी विशेष कॉरिडोर
  •  आर्थिक मागास आणि ओबीसी विद्यार्थ्यांना
    आर्थिक मदत
  • दारिद्रयरेषेखालील जनतेसाठी विशेष स्वतंत्र निधी
  •  'एम्स'सारख्या वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी निधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news