भाजपच हिंदूत्व पक्ष फोडणार, पोलादपूर सभेत उद्धव ठाकरेंची टीका

भाजपच हिंदूत्व पक्ष फोडणार, पोलादपूर सभेत उद्धव ठाकरेंची टीका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रायगड दौऱ्यावर आहेत. आज (दि. २) पोलादपूर येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील राजकारण हे वगळ्या वळणावर आहे. 'मतदारराजा जागा रहा, रात्र वैऱ्याची आहे.' आता झोपी गेलास, तर पुढे दिवससुद्धा वैऱ्याचे येतील. भाजपच हिंदूत्व पक्ष फोडणार आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

ठाकरे म्हणाले की, सध्या हिंदूत्वावरुन राजकारण केलं जात आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे ही भुमिका सरकारची असली पाहीजे. पण सध्या राजकारणावरुन असे दिसून येत आहे की, भाजपच हिंदूत्व पक्ष फोडणार, अशी टीकादेखील ठाकरेंनी यावेळी केली. भाजपचा अब की बार ४०० पार असा नारा आहे, पण आम्ही बघतोच ते कसे ४०० पार होतात, असे आव्हानही त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, तुमचे मित्र म्हणजे देश नव्हे, ही जनता म्हणजे देश आहे. जनतेसाठी काम करा! 'मतदारराजा जागा रहा, रात्र वैऱ्याची आहे.' आता झोपी गेलास, तर पुढे दिवससुद्धा वैऱ्याचे येतील.` आम्ही ज्ञानोबा, तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज, भवानी मातेची पालखी वाहू; पण भाजपची पालखी वाहणारे आम्ही नाही. आम्ही अन्यायावर वार करणारे 'वारकरी'.

ते म्हणाले की, भाजप भ्रष्टाचाऱ्यांना स्वतःकडे घेते आणि पावन करते. भ्रष्टाचार करा, भाजपत या, ही मोदी गॅरंटी आहे. महाराष्ट्रातील सरकारमध्ये असणारे मंत्री दिल्लीत आपल्या राज्याच्या दुरावस्थेबद्दल का बोलत नाहीत? ते खोके गिळून गप्प बसलेत. तुमच्याकडे स्वतःचा पक्ष कुठाय? आहे तो सगळा 'चोरबाजार' असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला.

'देशभक्त' नेहमी जिंकतो. तुम्ही जनता माझ्यासोबत असताना माझ्यासमोर कुणीही उभा राहू दे. मला पर्वा नाही! तुमचे मित्र म्हणजे देश नव्हे, ही जनता म्हणजे देश आहे. जनतेसाठी काम करा! 'मतदारराजा जागा रहा, रात्र वैऱ्याची आहे.' आता झोपी गेलास, तर पुढे दिवससुद्धा वैऱ्याचे येतील, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news