

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात देशाची सत्ता मिळविण्यासाठी राज्यात होणार्या आगामी निवडणुकीत किमान 45 खासदार आणि 200 आमदारांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून या अनुषंगाने भाजपची संघ पदाधिकार्यांसोबत महत्त्वाची बैठक गुरुवारी नागपुरात झाली.
विदर्भातील सर्व जागा जिंकण्याचे तसेच लक्ष्यपूर्तीच्या द़ृष्टीने आवश्यक उपाययोजना, बूथ पातळीवरील
नियोजन यासाठी भाजप आमदार, खासदार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी यांची ही समन्वयक बैठक नागपुरातील खामला अत्रे लेआऊट परिसरात आमदार समीर मेघे यांच्या कॉलेजमध्ये झाली.
या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह अतुल मोघे, क्षेत्र प्रमुख दीपक तामशेट्टीवार, विदर्भ प्रांत संघ चालक राम हरकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.