

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील निवडणुकीमध्ये बहुतांश राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यामध्ये अनास्था दाखविल्याचे पुढे आले आहे. दोन टप्प्यात फक्त आठ टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे. तथापि, दोन्ही टप्प्यामध्ये भाजपने सर्वाधिक 69 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केल्याचे चित्र आहे.
तिसर्या टप्प्यात 123 महिलांना तिकीट
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यात 1352 उमेदवार निवडणूक रिगणात असणार आहेत. यामध्ये 123 महिला उमेदवार असल्याची माहिती असोासिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या(एडीआर) अहवालात दिली आहे. तिसर्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण उमेदवारांच्या तुलनेत महिला उमेदवारांचे प्रमाण नऊ टक्के असणार आहे.