

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : थेरगाव प्रभाग क्रमांक 24 च्या भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे शुक्रवारी (दि.4) दिला.
या वेळी अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अभय मांढरे, सचिन बारणे, विराज बारणे आदी उपस्थित होते.नगरसेविका बारणे यांचे पती माजी नगरसेवक संतोष बारणे यांनी तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पाठोपाठ त्या ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राजीनामा दिल्यानंतर माया बारणे म्हणाल्या की, हुकूमशाही, भ्रष्ट कारभाराला कंटाळून भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
अनेक गैरव्यवहारावर तक्रारी केल्या. मात्र, भाजपच्या नेत्यांमुळे त्यावर कारवाई झाली नाही. स्थानिक नेतृत्वाला त्यांची हुजरेगिरी करणारे नगरसेक हवे आहेत. भाजपमुळे भ्रष्टाचारी महापालिका अशी ओळख निर्माण झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.