Bipasha Basu Pregnancy : गुड न्यूज! बिपाशा बसू आई होणार; बेबी बंपचे फोटो केले शेअर

Bipasha Basu Pregnancy : गुड न्यूज! बिपाशा बसू आई होणार; बेबी बंपचे फोटो केले शेअर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह यांच्या घरी (Bipasha Basu Pregnancy) लवकरच पाळणा हलणार आहे. बिपाशाने बेबी बंपचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांकडे शेअर केली आहे. बिपाशाने मंगळवारी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. ( Karan Singh GroverBipasha Basu Pregnancy )

तिने पोस्टमध्ये लिहिले : "एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश आमच्या जीवनात आणखी एक अनोखी सावली जोडत आहे. जी आम्हाला पूर्वीपेक्षा थोडे अधिक परिपूर्ण बनवते. आम्ही या जीवनाची सुरुवात वैयक्तिकरित्या केली आणि नंतर आम्ही एकमेकांना भेटलो आणि तेव्हा आम्ही दोघे होतो. फक्त दोघांसाठी खूप प्रेम, हे आम्हाला थोडेसे बरोबर वाटले नाही… म्हणून लवकरच, आम्ही जे पूर्वी दोन होतो ते आता तीन होऊ. आमच्या प्रेमाचे प्रतिक, आमचे बाळ लवकरच आमच्यात सामील होईल आणि आमचा आनंद भरुन जाईल. तुमच्या प्रेमाबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद आणि ते नेहमी आमचा एक भाग असतील. आमच्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल आणि आमच्या बाळाला, आमच्यासोबत आणखी एक सुंदर जीवन प्रकट केल्याबद्दल धन्यवाद. दुर्गा दुर्गा."

२०१५ मध्ये 'अलोन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांची भेट झाली होती. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बंगाली परंपरेनुसार दोघांनी एप्रिल २०१६ मध्ये लग्न केले होते. नंतर त्यांनी त्यांच्या इंडस्ट्रीतील मित्रांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनेक बॉलीवूड स्टार्संनी हजेरी लावली होती. या जोडप्याने डेंजरस या वेबसीरिजमध्ये एकत्र काम केले होते.

सुपरमॉडेल ते अभिनेत्री असा बिपाशा बसूचा प्रवास राहिला आहे. डर सबको लगता है या टीव्ही शोमध्ये ती प्रेझेंटर देखील होती. तिने २००१ मध्ये 'अजनबी' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. धूम २, जिस्म, फिर हेरा फेरी, दम मारो दम, रेस, ओमकारा, बचना ए हसीनो आणि राज यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे बिपाशा सर्वांधिक चर्चेत आली होती. ( Bipasha Basu Pregnancy )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news