

पुढारी ऑनलाईन डेस्क: बिहारमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी नितीश कुमार यांची खिल्ली उडवली आहे. बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी एक्स पोस्ट करत बिहारमधील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. (Bihar Politics)
बिहारमधील काँग्रेसचेकेंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी एक्स पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'लग्न एकासोबत अन् अफेअर दुसऱ्यासोबत' हा नितीशकुमारांचा स्वभाव बनला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. (Bihar Politics)
बिहारमधील राजकीय खेळ शिगेला पोहोचला आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून ते भाजपसोबत सरकार स्थापणार असल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी जेडीयूच्या आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देण्यासाठी राजभवनात गेले आणि त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला. संध्याकाळी चार वाजता ते नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे समोर आले आहे.
नितीश यांना रोखण्याची आरजेडीची रणनीती सध्या तरी कामी आलेली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही पाटणा येथे पोहोचले आहेत. शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आधी राजीनामा द्या, मग तुम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले जाईल अशी अट भाजपने नितीश कुमार यांच्यासमोर अट ठेवली होती.