खराब मेटल डिक्टेटरने शोधला सर्वात मोठा सोन्याचा तुकडा

खराब मेटल डिक्टेटरने शोधला सर्वात मोठा सोन्याचा तुकडा
Published on
Updated on

लंडन : पाश्चात्य देशांमध्ये अनेक हौशी लोक मेटल डिक्टेटरच्या सहाय्याने जमिनीत दडलेला धातूचा खजिना शोधण्याचा प्रयत्न करीत असतात. अनेक वेळा त्यामध्ये यशही येते व प्राचीन काळातील वस्तू सापडतात. विशेष म्हणजे आता इंग्लंडमध्ये तेथील आजपर्यंतचे सर्वात मोठे गोल्ड नगेट एका खराब मेटल डिटेक्टरने शोधले आहे! जमिनीखाली असलेल्या सोन्याच्या खनिजाचा हा तुकडा असतो.

मेटल डिटेक्टोरिस्ट रिचर्ड ब्रॉक यांनी हा सोन्याचा मोठा तुकडा श्रॉपशायरमध्ये शोधला होता. पश्चिम इंग्लंडमधील ही एक कौंटी आहे. ब्रॉक हे गेल्या 35 वर्षांपासून मेटल डिटेक्टिंग करीत आहेत. त्यांनी यावेळी वीस मिनिटे शोध घेतल्यावर हा इंग्लंडमधील सर्वात मोठा सोन्याचा तुकडा सापडला. त्याचे वजन 64.8 ग्रॅम आहे. ब्रॉक यांनी सांगितले, मी जे मशिन वापरत होतो, ते बरेचसे खराब होते.

त्याच्याकडून निम्मेच काम होत होते. मात्र, तरीही हा इतका मोठा शोध लागला. त्यावरून असे दिसते की, तुमच्या उपकरणांपेक्षा तुमची मेहनत, चिकाटीच अधिक महत्त्वाची ठरते. हे गोल्ड नगेट पाहिल्यावर माझा डोळ्यांवर विश्वास बसेना, असेही त्यांनी सांगितले. या गोल्ड नगेटला लिलावात 37,800 डॉलर्स म्हणजे सुमारे 31 लाख, 52 हजार, 767 रुपयांची किंमत मिळेल असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news