Mumbai Indians in Trouble : मुंबई इंडियन्ससाठी धोका! सूर्यकुमार यादव संपूर्ण IPL हंगामाला मुकणार?

Mumbai Indians in Trouble : मुंबई इंडियन्ससाठी धोका! सूर्यकुमार यादव संपूर्ण IPL हंगामाला मुकणार?
Published on
Updated on

मुंबई, वृत्तसंस्था : Mumbai Indians in Trouble : आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना पाचवेळा विजेतेपद मिळवणार्‍या मुंबई इंडियन्स संघाची काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार यादव या हंगामात खेळणार की नाही, अशी चर्चा सुरू असताना स्वत: सूर्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसला एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये सूर्याने तुटलेले हृदय टाकले आहे. त्याच्या या पोस्टवरून आता चाहत्यांची धाकधुक आणखी वाढली आहे.

इन्स्टावरील तुटलेल्या हृदय (ब्रोकन हर्ट) या पोस्टमधून सूर्याला नेमके काय म्हणायचे आहे हे अद्याप समजले नसले तरी याचा अर्थ अनेकजण तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकणार की काय, असा घेत आहेत. याबाबत मुंबई इंडियन्स किंवा बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अपडेट आले नाहीत. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची पहिली मॅच गुजरातविरुद्ध 24 मार्चला अहमदाबाद येथे होणार आहे. (Mumbai Indians in Trouble)

मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माकडून कर्णधारपदाची सूत्रे हार्दिक पंड्याकडे देण्यात आली आहेत. संघातील हा बदल चाहत्यांना आवडला नाही. अशातच आता आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवच्या फिटनेसमुळे मुंबई इंडियन्सची काळजी वाढली आहे. सूर्याच्या दुखापतीवर भारतीय क्रिकेट बोर्डाकडून अद्याप मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला अपडेट मिळाले नाहीत. (Mumbai Indians in Trouble)

सूर्यकुमारला हर्नियाची दुखापत असून तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डिसेंबरमध्ये झालेल्या टी-20 मालिकेपासून मैदानाबाहेर आहे. 33 वर्षीय सूर्यकुमार हा मुंबई इंडियन्सच्या संघातील मधळ्या फळीतील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. हातातून निसटत चाललेल्या अनेक सामन्यांत सूर्याने मुंबई इंडियन्सला एकहाती विजय मिळून दिला आहे. आयपीएलच्या 124 सामन्यांत त्याने 3 हजार 249 धावा केल्या आहेत. यात एका नाबाद शतकाचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news