

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री भूमी पेडणेकर वर भक्षक मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वानुमते कौतुक आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. (Bhumi Pednekar ) या चित्रपटातील भूमीच्या अतिशय सूक्ष्म आणि चमकदार अभिनयामुळे तिची सर्वस्तरातून प्रशंसा होत आहे. जागतिक कंटेट प्लॅटफार्मवर भारताला अभिमान वाटावा, असा आणखी एक मैलाचा दगड भक्षकने निर्माण केला आहे. (Bhumi Pednekar)
संबंधित बातम्या –
भूमीसाठी हे यश आणखी गोड बनवणारी गोष्ट म्हणजे तिच्या आईची खास भेट – सोन्याचे नाणे! आणि यामागे एक सुंदर इतिहास आहे.
भूमी म्हणते, "माझी आई माझी सर्वात मोठी चिअरलीडर आणि माझी सर्वात मोठी टीकाकारही आहे. म्हणून, प्रत्येक वेळी मी एखादा प्रोजेक्ट करते, तेव्हा मी तिच्या रिव्ह्यूची वाट पाहते. ती खूप प्रामाणिक आहे आणि तिने मला वेळोवेळी सर्वात रचनात्मक अभिप्राय दिला आहे. जेव्हा तिला माझा अभिनय आवडतो तेव्हा ती आश्चर्यकारकपणे गोड आणि हृदयस्पर्शी असे काहीतरी करते.
भूमी पुढे सांगते, "जेव्हा दम लगा के हैशा प्रदर्शित झाला, कलाकार आणि क्रू स्क्रिनिंगनंतर, माझी आई आणि मी घरी आलो आणि तिने मला सोन्याचे नाणे दिले! तिला माझा अभिनय आवडला होता आणि तिच्याकडे कोणतीही नोंद नाही हे सांगण्याची तिची पद्धत होती. मला आठवते की, तिला मिठी मारली आणि रडले. त्या दिवसापासून मी माझ्या कामासाठी तिच्याकडून सोन्याचे नाणे कधी मिळवणार याची वाट पाहत असते. माझ्यासाठी हा सर्वात मोठा पुरस्कार आहे."
ती पुढे म्हणते, "म्हणून, जेव्हा मी सांड की आँख, टॉयलेट: एक प्रेम कथा, सोनचिरिया, लस्ट स्टोरीज, बाला, शुभ मंगल सावधान, बधाई दो आणि इतर काही प्रोजेक्ट्स केले आहेत, तेव्हा माझ्या आईने मला हे गिफ्ट केले आहे. माझ्यासाठी हे म्हणजे जग आहे. तिने भक्षकसाठीही तेच केले!"
भक्षक बद्दलच्या आईच्या भावनिक प्रतिक्रियेबद्दल बोलताना भूमी म्हणाली, "चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि तिच्याकडे पाहून अर्थातच मलाही रडू आले , मला माझ्या दम लगा के हैशा क्षणाची आठवण झाली. मी माझ्या आईला इतके भारावलेले कधी पाहिले नाही. घरी परतताना आम्ही अजिबात बोललो नाही. मला वाटते की तिने जे पाहिले ते तिला खोलवर स्पर्श करुन गेले होते."
ती पुढे सांगते, "जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा मला एक सोन्याचे नाणे मिळाले आणि ती मला पुन्हा सोन्याचे नाणे देण्याची वाट पाहत असल्याचे मला सांगितले."