भिगवण पाेलिसांकडून आंतरराज्य टाेळीचा पर्दाफाश, पैसे काढून देतो म्हणत एटीएम कार्ड बदलायचे, नंतर…

भिगवण पाेलिसांकडून आंतरराज्य टाेळीचा पर्दाफाश, पैसे काढून देतो म्हणत एटीएम कार्ड बदलायचे, नंतर…
Published on
Updated on

भिगवण (पुणे), पुढारी वृत्तसेवा: एटीएम सेंटरमध्ये आलेल्या लोकांचे पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड व पासवर्ड हात चलाखीने काढून नंतर लाखो रुपये काढणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश भिगवण पोलिसांनी केला आहे. मुंबई, ठाणे भागातून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

अहमद इस्तियाक अली (वय २७, रा. मेढावा, ता. जि. प्रतापगढ), जैनुल जफरल हसन (वय २८, रा. कमलानगर, मुंबई, मूळ मेढावा), इरफान रमजान अली (वय १९, रा. बजापूर, ता. जि. प्रतापगढ) यांना अटक केली आहे. तिघेही उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. भिगवण येथे १६ मार्च रोजी प्रभू मेडिकल येथील हिताची एटीएम सेंटरमध्ये हेमंत गोफणे, (रा. वाटलुज, ता. दौंड) हे पैसे काढण्यासाठी गेले हाेते. तेथील अनोळखी इसमाने पैसे काढून देतो असे सांगून त्यांच्या एटीएमचा पासवर्ड माहिती करून घेतला. नंतर हातचलाखीने त्याच्याजवळील बनावट एटीएम कार्ड गोफणे यांना देऊन त्यांच्या खात्यातून १ लाख ३० हजार तीनशे रुपये काढले.

भिगवण पोलिसात याप्रकरणी अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल होता. निमगाव केतकी येथेही असाच गुन्हा घडला होता. यावरून सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकाला कार्यान्वित केले. अज्ञात आरोपींचे तांत्रिक विश्लेषण व एटीएम सेंटरमधील कॅमेरे, टोलनाक्याच्या सी.सी.टी.व्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा शोध घेतला. आरोपींना चाहूल लागल्यामुळे संशयित आरोपींनी धूम ठोकली. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. पोलिसी खाक्या दाखवताच चोरीची कबुली दिली.

कार, ५१ एटीएमसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

फिर्यादीचे एटीएम, अपहृत रक्कम, गुन्ह्यात वापरलेली कार (क्र. एम. एच. ०३ बी.सी. ६३८६) व विविध बँकांचे ५१ एटीएम कार्ड असा ५ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम, अंमलदार सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, रणजीत मुळीक यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news