सदलगा दूधगंगा नदीवरील जुना पूल पाण्याखाली

सदलगा दूधगंगा नदीवरील जुना पूल पाण्याखाली
Published on
Updated on

सदलगा : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने दूधगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. नदीकाठच्या पिकात पाणी शिरले असून दुसर्‍यांदा येथील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. महापुराच्या धास्तीने आतापासूनच नदीकाठावरील नागरिक हतबल झाले आहेत. माळभागातील नणदी, नागराळ, शिरगाव, हिरेकुडी, गिरगाव, नणदीवाडी, नेज भागातील पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणारा आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सदलगा दूधगंगा नदीवरील जुना पूल पाण्याखाली

अकोळ : चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सिदनाळ बंधार्‍यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिसरातील सर्व ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. येथील ओढ्याला पाणी आल्याने दुपारनंतर शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. नदीकाठावरील ऊस व अन्य पिकांमध्ये पाणी साचून राहिले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. तहसीलदार प्रवीण कारंडे व अधिकार्‍यांनी बंधार्‍याला भेट देऊन पाहणी केली.

जत्राट बंधारा दुसर्‍यांदा पाण्याखाली
जत्राट : जत्राटसह परिसरात आणि तळकोकणात संततधार पाऊस सुरू असून वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा दुसर्‍यांदा जत्राट बंधारा पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

प्रशासनातर्फे सतर्कता बाळगून कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी बसवेश्वर चौक पोलिस ठाणे, महसूल खाते व ग्रामपंचायत प्रशासनाने बॅरिकेट्स उभारून नदीकडे जाणारे मार्ग बंद केले आहेत. जत्राटहून भिवशी, सौंदलगा, बेनाडी, आडी, जैनवाडी, कागल व कोल्हापूर औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

पावसामुळे ऊस, सोयाबीन, भुईमूग, ताग, उडीद व भाजीपाला पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news