

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : दुसर्या रेल्वेगेटजवळील रेल्वे रुळाशेजारील भिंत कलली असून, ती कधीही कोसळण्याचा मार्गावर आहे. यामुळे या ठिकाणाहून जाणार्या येणार्या नागरिकांना आणि रेल्वेलाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ही भिंत सुमारे सहा महिन्यापूर्वीच बांधण्यात आली आहे.
दुसर्या रेल्वे गेट टिळकवाडीकडे जाणार्या रस्त्याच्या डाव्या बाजूला रेल्वेचे रेडिमेड कुंपण एका बाजूला कलले आहे. त्यापुढे दुसर्या गेटपर्यंत भिंत कललेली आहे. ही भिंत कधीही पडू शकते. तसेच काही स्पॉट सेंटरवर भिंतीचे खांब गायब आहेत. सिमेंटपासून बनवलेल्या भिंतीवरील प्लेट्स लटकलेल्या आहेत. ही भिंत रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ आहे. ट्रेनचा वेग आणि रुळावरील कंपन यामुळे भिंत पडल्यास मोठी दुर्घटना किंवा अपघात होऊ शकतो.