बेळगाव : बागेवाडी टोलनाक्यावर दोन कोटी जप्त

बेळगाव : बागेवाडी टोलनाक्यावर दोन कोटी जप्त

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईहून मंगळूरला निघालेली बस हिरेबागेवाडी टोलनाक्यावर अडवली. यामध्ये बॅगेत 2 हजार रु. मूल्याच्या प्रत्येकी 100 नोटांची 100 बंडल आढळून आली असून ही रक्कम दोन कोटी रु. होते. ती पोलिसांनी जप्त करून याची माहिती आयकर विभागाला दिली आहे.

मुंबईहून मंगळूरला खासगी बस (केए-70 1459) निघाली होती. निवडणूक भरारी पथक व पोलिसांनी संयुक्तरित्या जेव्हा या बसमध्ये तपासणी केली तेव्हा एका प्रवाशाकडे बॅगेत रक्कम सापडली. ही रक्कम मुंबई येथील एका व्यापार्‍याची आहे. महेंद्रकुमार नामक व्यापार्‍याने त्याचा कर्मचारी पिंटू सिंग याच्याकडे मंगळूरच्या व्यापार्‍याला ही रक्कम देऊन ये, म्हणून पाठवले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news