बेळगाव : पत्नीचा तीनदा गर्भपात; पतीने घेतला गळफास

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
लग्‍नाला सहा वर्षे झाली. पत्नी गर्भवतीही राहिली. परंतु, तिचा तीनवेळा नैसर्गिक गर्भपात झाला. ही बाब मनाला लावून घेत तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. लगमाप्पा यल्लाप्पा भरनट्टी (वय 28, रा. जुने होसूर, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.

काकती पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लगमाप्पाच्या लग्‍नाला सहा वर्षे झाली. पत्नी तीनवेळा गर्भवती राहिली. परंतु, चौथ्या महिन्यात तिचा नैसर्गिक गर्भपात होत होता. लगमाप्पाने हीच बाब मनाला लावून घेतली होती. यामुळे मानसिकरीत्या अस्वस्थ बनलेला लगमाप्पा सोमवारी पहाटे पाच वाजता घरातून बाहेर गेला. होसूरजवळील यल्लाप्पा मूकनवर यांच्या शेतात जाऊन त्याने झाडाला गळफास घेतला. त्याने पॅन्ट व शर्ट काढून एकमेकाला जोडले. एक टोक फांदीला तर दुसरे टोक गळ्याभोवती बांधून गळफास घेतला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच काकतीचे उपनिरीक्षक अविनाश वाय. ए. यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृताची पत्नी हालव्वा हिने दिलेल्या फिर्यादीनुसार याची नोंद झाली आहे. उपनिरीक्षक अविनाश तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news