

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : थकबाकी असणार्या ग्राहकांनादेखील गृहज्योती योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु थकबाकी 30 सप्टेंबरपर्यंत हेस्कॉमला अदा करावी लागणार आहे. गृहज्योतीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी नोंदणी करण्यात येत आहे.
नोंदणी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. सरकारने यामध्ये थकबाकीदारांनाही लाभ मिळण्याची सोय केली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जे ग्राहक 25 जुलैपर्यंत नोंदणी करतील त्यांना ऑगस्टपासून सवलत मिळेल. 25 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणार्यांना सप्टेंबरपासून सवलत मिळणार आहे. वीजबिल आकारणी 25 ते 25 पर्यंत करण्यात येते. त्यानुसार बिलात सवलत देण्यात येणार आहे.