बेळगाव : ट्रेलर स्वतःच लपवून चोरीची तक्रार

बेळगाव : ट्रेलर स्वतःच लपवून चोरीची तक्रार
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  स्वमालकीचे दोन ट्रॅक्टर ट्रेलर लपवून ठेवून ते चोरीला गेल्याचा बनाव करणार्‍या तक्रारदाराला गोकाक पोलिसांनी अटक केली. संभाजी यरगट्टी ( मूळ रा. राजापूर, सध्या हिरेनंदी, ता. गोकाक) असे संशयिताचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी संभाजीने गोकाक पोलिस ठाण्यात स्वमालकीचे दोन ट्रेलर चोरीला गेल्याची तक्रार संभाजीचे वडील शिवाजी रामाप्पा यरगट्टी यांनी 11 जुलै रोजी गोकाक ग्रामीण पोलिसांत दिली होती. त्यानुसार पोलिसांनी फिर्याद घेतली होती. परंतु, ट्रॅक्टर दरवाजासमोर ठेवून फक्त ट्रेलरच कसे नेले, असा संशय गोकाकचे निरीक्षक गोपाल राठोड यांना आला. त्यांनी उलट चौकशी सुरू केली तेव्हा संभाजी याने दोन्ही ट्रेलर नरगुंद (जि. धारवाड) येथे पाहुण्यांकडे लपवून ठेवले होते.

या प्रकरणी राठोड यांनी कडक चौकशी केली असता संभाजी याने अनेक राजकारण्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कसून चौकशी सुरूच ठेवली. यावेळी संभाजीने हा सर्व बनाव विम्याची रक्कम मिळविण्यासाठी केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यालाच अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news