बेळगाव : गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची  कपिलेश्वर मंदिराला  भेट

बेळगाव : गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची कपिलेश्वर मंदिराला भेट

Published on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात शनिवारी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदिच्छा भेट दिली. अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राकेश कलघटगी, राजू भातकांडे, चिकमंगळूर दत्तात्रयमठाचे पुरोहित समूह यांच्याकडून मंत्रोच्चारात मुख्यमंत्री सावंत यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी काल सर्प मंडलाचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री सावंत यांनी मंदिराच्या विकासाची प्रशंसा केली. मंदिर ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री व दत्तात्रेय मठाचे मठाधिपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराचे ट्रस्टी सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राकेश कलघटगी, राहूल कुरणे, विवेक पाटील, प्रसाद बाचुळकर, अभय लगाडे, अनिल मुतकेकर, जोतिबा कावळे, विकास शिंदे, दौलत जाधव, संजय मनगुतकर, सचिन आनंदाचे, गणेश देवर, विलास पाटील, प्रकाश घोरपडे आदी सेवेकरी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news