बेळगाव : कृष्णा नदीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

बेळगाव : कृष्णा नदीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

अंकली; पुढारी वृत्तसेवा : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून येडूर टेक येथील युवकाने कृष्णा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. कृष्णा दुंडाप्पा पाटील (वय 30) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

कृष्णा पाटील या युवकाचा मृतदेह जुने येडूर येथे कृष्णा नदीच्या पात्रात आढळून आला. या घटनेची नोंद अंकली पोलिस ठाण्यात झाली असून उपनिरीक्षक रुपाली गुडूगी पुढील तपास करत आहेत. चिकोडी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. त्याच्या पश्चात आई आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news