बेळगाव : ऐन जुलैमध्ये ऑक्टोबर हिट!

बेळगाव : ऐन जुलैमध्ये ऑक्टोबर हिट!
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  ऐन पावसाळ्याच्या मध्यावर आणि श्रावणाच्या तोंडावर बेळगावकरांना गुरुवारी (दि. 28) ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागला. सकाळी पावसाळी वातावरण आणि दिवसभर सूर्यदर्शन असे चित्र दिसून आले. तापमान 29 अंशावर पोहोचल्यामुळे उष्णतेतही भर पडली होती.

आज सकाळी ढगाळ वातावरण होते. नऊच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. दहा वाजेपर्यंत पाऊस झाला. पण, त्यानंतर दिवसभर पावसाने पाठ फिरवली. सूर्यदर्शन झाले. उन्हाचे चटके सहन करावे लागले. वातावरणातील या बदलामुळे उष्णतेत वाढ झाली. तापमान 29 अंशावर पोहोचले असून किमान तापमान 22 अंश इतके होते.

काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पण, जूनच्या अखेरीस आणि जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांत समाधान आहे. नदी, नाल्यांना पाणी आहे. जलाशयांतील विसर्ग कमी झाला असला तरी अद्याप आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली तरी चालेल असे चित्र आहे. पण, ऐन श्रावणात उन्ह, पावसाचा खेळ पाहायला मिळावा, अशी अपेक्षा लोकांत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news