बंगळूर : गांजा प्रकरणी मंगळुरात 12 विद्यार्थ्यांना अटक

file image
file image

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक ठिकाणी तसेच महाविद्यालयांमध्ये गांजा विक्री प्रकरणी केरळमधील 12 विद्यार्थ्यांना मंगळूर सीसीबी पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून 900 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याची किंमत 20 हजार रुपये होते.
शानूफ अद्बुल गफूर (21), मोहम्मद रसीन (22), गोकुल कृष्णन (22), शारुन आनंद (19), अनंतु के. पी. (18), अमल (21), अभिषेक (21), निदाल (21), शाहीद एम. टी. पी. (22), फहाद हबीब (22), मोहम्मद रिशीन ( 22), रिजिन रियाज (22) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 20 हजारांच्या गांजासह स्मोकिंग पाईप, रोलिंग पेपर, 4500 रुपये रोख, 11 मोबाईल फोन, डिजिटल वजन असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news