निपाणी; पुढारी वृत्तसेवा : निपाणी परिसरात संततधार पावसामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. सौंदलगा हद्दीत मांगूर फाट्यानजीकचा लहान भुयारी मार्गातून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. त्यामुळे जुना ब्रिटिशकालीन पूल रहदारीसाठी बंद झाला असून वाहतूक पर्याय मार्गाने वळविण्यात आली आहे.
यमगर्णी, बुदिहाळ, कोडणी, नांगनूर या गावांना सदर भुयारी मार्गातून जावे लागते. मात्र, सध्या हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. नागरिकांना पर्यायी मार्ग जवळ नसल्याने मांगूर फाटा सर्कलवरून ये- जा करावी लागत आहे.