जमखंडी; पुढारी वृत्तसेवा : योजना वेळेत पूर्ण न करणे, निकृष्ट दर्जाचे काम, वसतिगृहात सुविधा पुरविण्यात गलथान कारभार करणार्या अधिकार्यांनी आपल्या कामात सुधारणा करावी; अन्यथा त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल, असा इशारा आ. आनंद न्यामगौड यांनी जमखंडी तालुका पंचायतीमध्ये आयोजित अधिकार्यांच्या त्रैमासिक आढावा बैठकीत दिला.
मागासवर्गीय बीसीएम वसतिगृहात व्यवस्था योग्य नसल्याच्या तक्रारी असून तेथे अस्वच्छ व अंधारातील स्वच्छतागृहे असून तुमची मुले येथे राहू शकतात काय, असा सवाल बीसीएम अधिकारी राजू कडकोळ यांना केला. लवकरच वसतिगृहांना आपण भेट देणार असून येथे सुधारणा आढळून न आल्यास अधिकार्यांविरुध्द कारवाई करण्याचा इशारा दिला.
तालुक्यातील गणीबुदनी रस्ता निकृष्ट असून एखादी सामान्य व्यक्तीही याहून अधिक चांगला रस्ता बनवू शकेल. तुम्ही अभियंते असून काय उपयोग, अशा कडक शब्दात पंचायत राज खात्याचे अभियंते राठोड यांची झाडाझडती घेण्यात आली.