काँग्रेसच्या नेत्यांनी एवढे कमावले की… कर्नाटकच्या आमदाराचा घरचा आहेर

Congress
Congress

बंगळूर; वृत्तसंस्था : काँग्रेस नेत्यांनी नेहरू-गांधी घराण्याच्या नावाने एवढी संपत्ती कमावली आहे की, त्यांच्या येणार्‍या 3 पिढ्या घरी बसून खातील, असे सनसनाटी विधान कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. आर. रमेशकुमार यांनी केले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू असताना त्यांनी हे विधान करून वादाचा धुरळा उडवून दिला आहे.

त्यामुळे याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंगळूूरच्या फ्रीडम पार्कमध्ये निदर्शने केली. रमेश म्हणाले, काँग्रेस नेत्यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी व सोनिया गांधींच्या नावाने अमाप संपत्ती गोळा केली आहे. त्यांच्या 3 पिढ्या बसून खातील. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंतर्गत मतभेद विसरून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले पाहिजे. दरम्यान, त्यांच्या या विधानावर काँग्रेसकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. यापूर्वीदेखील रमेशकुमार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news