कर्नाटक : शेतकरी आत्महत्यांत बेळगाव दुसरा

कर्नाटक : शेतकरी आत्महत्यांत बेळगाव दुसरा
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील प्रभावी राजकीय नेत्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्‍यांनी मागील दशकभरात आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, प्रभावी नेते यांच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. दशकभरात राज्यातील 8227 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा हावेरी अग्रस्थानी असून, बेळगाव जिल्हा दुसर्‍या स्थानी आहे.

मागील दशकभरात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. 2015 पर्यंत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण राज्यात कमी होते. त्यानंतर मात्र प्रत्येक वर्षी सरासरी हजार शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बेळगाव जिल्ह्यात 625 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. राज्यात 2010-2011 ते 2021-22 या दशकभरात शेतकरी आत्महत्यांची माहिती उपलब्ध झाली आहे. 2015-2016 या कालावधीत राज्यात प्रत्येक वर्षी 100 ते 250 शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यानंतर मात्र यामध्ये वाढ झाली आहे. राज्यात 2018 पूर्वी पडलेल्या अवर्षणामुळे शेतीला फटका बसला. तर 2018 नंतर अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. 2020 नंतर कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडले. परिणामी आत्महत्यांच्या प्रकरणात वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वाधिक आत्महत्या झालेले जिल्हे

जिल्हा         आत्महत्या
हावेरी               628
बेळगाव            624
म्हैसूर               601
चिक्‍कमगळूर     546
हासन               535

वर्षनिहाय झालेल्या आत्महत्या

वर्ष              आत्महत्या
2010-11        251
2011-12        162
2012-13        146
2013-14         89
2014-15        116
2015-16        1525
2016-17        1203
2017-18        1323
2018-19        1087
2019-20        1083
2020-21         822
2021-22         420

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news