

बेळगाव : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी गेल्या चार दिवसांपूर्वीपासून प्रतीक्षेत असलेली काँग्रेसची 124 उमेदवारांची यादी शनिवारी (दि. 25) जाहीर झाली. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात आली. त्यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणार्या म्हैसूर येथील वरुणा मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार कणकपूर येथून तर सतीश जारकीहोळी यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
चिक्कोडी-सदलगा : गणेश हुक्केरी
कागवाड : बरमगौडा कागे
कुडची : महेंद्र केतम्मनावर
हुक्केरी : ए. बी. पाटील
यमनमर्डी : सतीश जारकीहोळी
बेळगाव ग्रामीण : लक्ष्मी हेब्बाळकर
खानापूर : डॉ. अंजली निंबाळकर बैलहोंगल : महांतेश कौजलगी
रामदुर्ग : अशोक पट्टण
जमखंडी : अनंत न्यामगौडा
हुनगुंद : विजयानंद एस. कशप्पनावर
मुद्देबिहाळ : सी. एस. नादगौडा
बसवनबागेवडी : शिवानंद पाटील