Nipani Accident| मित्राच्या हळदी समारंभाहून परतताना तरूणावर काळाचा घाला; दुचाकी झाडावर आदळून अपघाती मृत्यू

शांतिगिरी-कोथळी मार्गावरील घटना
Nipani Accident News
दुचाकी झाडावर आदळून अपघाती मृत्यू
Published on
Updated on

निपाणी : मित्राच्या हळदी समारंभाचा कार्यक्रम करून परतताना तरूणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची झाडाला धडक बसली. या अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२०) मध्यरात्री शांतिगिरी-कोथळी मार्गावर घडली. प्रतिक सत्यगौडा पाटील (वय २८, रा. गळतगा) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद खडकलाट पोलिसात झाली आहे.

Nipani Accident News
पुणे-नाशिक महामार्गावर कार दुभाजकाला धडकली : एक ठार

याबाबतची अधिक माहिती अशी, प्रतिक पाटील याच्या मित्राचे लग्न सोमवारी होते. तत्पूर्वी तो रविवारी सायंकाळी शांतिगिरी डोंगर येथे हॉलमध्ये हळद कार्यक्रम असल्याने तो मित्रांसमवेत गेला होता. हळदीचा कार्यक्रम आटोपून तो दुचाकीवरून आपल्या मूळगावी मध्यरात्री परतत असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी झाडाला जाऊन धडकली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यानुसार दुचाकी नंबर व मृताच्या जवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे नागरिकांनी कुटुंबीयांसह पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी उपनिरीक्षिका अनिता राठोड, हवलदार विशाल संभाजी यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.त्यानंतर चिकोडी येथे सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एकुलता एक असणारा प्रतिक मनमिळाऊ व हळव्या स्वभावाचा होता. तो बेडकिहाळ येथील एका कंपनीत काम करत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nipani Accident News
Farmacist Youth Death | सातार्‍यातील अपघातात फार्मासिस्ट युवकाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news