50 Acres Augarcane Burnt | तब्बल 50 एकरांतील ऊस खाक

येडूर येथील घटना; शॉर्टसर्किटमुळे लागली आग
50 Acres Augarcane Burnt
येडूर : ऊस पिकाला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

अंकली : येडूर-कल्लोळ बंधार्‍यापासून कागवाडे शेतापर्यंतच्या परिसरात शॉर्टसर्किटने सुमारे 50 एकरांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. विद्युत मोटारींना जाणार्‍या विद्युत वाहिन्यांच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या घटनेत महेश कागवाडे, ईरगौड कागवाडे, सागर चव्हाण, शेखर मिरजे, प्रशांत उमराणे, निलेश खडके, अनिल चव्हाण, सुरेश कागवाडे, अशोक मिरजे, सतीश चव्हाण, रमेश मोहिते या शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

50 Acres Augarcane Burnt
Belgaum News: चोर्ला मार्गाची चार महिन्यांत धुळधाण

संपूर्ण ऊस पीक जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना, चिकोडी अग्निशमन दल, सदलगा अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने भेट देऊन आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. या घटनेत शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news