Belgav News : जिल्ह्यातील बेकायदेशीर खाणींवर कारवाई कधी?

मोजक्याच ठिकाणी छापे; अनेक ठिकाणी बेकायदा दगड व माती उत्खनन
belgav news
जिल्ह्यातील बेकायदेशीर खाणींवर कारवाई कधी?File Photo
Published on
Updated on

When will action be taken against illegal mines in the district?

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर खनिज उत्खनन व क्वॉरी सुरू आहेत. याविरोधात खाण व भूगर्भ खात्याने आघाडी उघडली असून गेल्या पंधरा दिवसांत इनाम बडसमधील तीन खाणींवर छापा टाकण्यात आला. याप्रकरणी ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यात अजूनही बेकायदेशीर खाणी व क्वॉरी सुरू असून त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

belgav news
निपाणीत उद्या हिंदू मेळावा

खादरवाडी डोंगरात मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह भूगर्भ खात्याकडे तक्रार केली करण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. सध्या येथील मातीचे उत्खनन थांबवण्यात आले असले तरी पुन्हा सुरू होण्याची भिती आहे. विविध तालुक्यांमध्ये अशा प्रकारे मातीचे उत्खनन सुरू आहे. त्यामधील मोजक्याच खाणचालकांनी परवानगी घेतली आहे. उर्वरीत उत्खनन बेकायदेशीर आहे. याकडे आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

belgav news
खानापुरात महामार्गाच्या बेशिस्त कामामुळे वाहतूक जाम

बेळगाव तालुक्यात खडी मशीन व्यवसाय फोफावला आहे. काही क्वॉरी बेकायदेशीर असल्याचे उघडकीस येत आहे. परवानगी नसताना त्यांना हेस्कॉमकडून बीजजोडणी देण्यात आली आहे. अशा क्लॉरीचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश आहेत. मात्र, हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी अद्याप वीज कनेक्शन तोडले नाही. याबाबत कायदेशीर सुरू असलेल्या क्वॉरीमालकांकडून अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडे अजूनही दुर्लक्ष झाले आहे.

इनाम बडसमधील तीन खाणींवर कारवाई करुन ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही बेकायदेशीर खाणींवर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. बेकायदेशीर क्वॉरी किंवा खाणी सुरू असतील तर त्याची माहिती खात्याला पुरवावी.
- बिंदन पाटील, खाण व भूगर्भ खात्याच्या अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news