A Hindu gathering will be held in Nipani tomorrow.
निपाणी : पुढारी वृत्तसेवा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोमवार दि. २६ रोजी श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने भव्य हिंदू मेळाव्याचे आयोजन येथील संत वाल्मिकी ऋषी मंदिरात करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता मेळावा होणार असल्याची माहिती संघटनेचे चिकोडी जिल्हाध्यक्ष अॅड. निलेश हत्ती यांनी दिली.
हत्ती म्हणाले, हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्यावतीने गेल्या आठवडाभरापासून शहर तसेच ग्रामीण भागात अभियान राबवण्यात आले आहे. यामध्ये घरोघरी जाऊन बांधवांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या वर्षभरात संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा आणि येत्या काळातील संघटनात्मक कार्यपद्धतीवर तसेच हिंदू समाजापुढील आव्हाने आणि संघटनात्मक बांधणी यावर चर्चा केली जाणार आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून हिंदू समाजाची एकजूट दाखवून देण्याचा निर्धार नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. युवक-युवतींसह महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. हत्ती यांनी केले आहे.

