Vijayapura Accident | ताळिकोटजवळ कारची झाडाला धडक; बागलकोट पोलीस विभागातील 'जीएचओ'चा जागीच मृत्यू

हैदराबादहून मुलगी आणि मित्रासह कारने बागलकोटकडे परत येताना अपघात

Talikoti Car Crash News
Talikoti Car Crash NewsजPudhari
Published on
Updated on

Talikoti Car Crash News

विजयपूर : हैदराबादहून मुलीला घेऊन बागलकोटकडे परत येत असताना ताळिकोटजवळ झालेल्या भीषण कार अपघातात बागलकोट जिल्हा पोलीस कार्यालयात जीएचओ म्हणून कार्यरत असलेले निसारहमद अब्दुलरजाक हिप्परगी (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२५) पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, निसारहमद हिप्परगी यांनी त्यांची मुलगी नेहा हिला आयपीएस कोचिंगसाठी हैदराबाद येथे सोडले होते. कोचिंग आणि परीक्षा पूर्ण झाल्यानंतर ते मुलगी नेहा आणि मित्र बसवराज सोना यांच्यासह कारने बागलकोटकडे परत येत होते. ताळिकोट परिसरातील एका वळणावर ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली.


Talikoti Car Crash News
Vijayapura Fire | तिकोटा येथील कृषी सेवा केंद्राला भीषण आग: २ कोटी ५० लाखांचे नुकसान

या भीषण अपघातात निसारहमद हिप्परगी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबत मृतांचे जावई अजीजहमद कुडची यांनी ताळिकोट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान, अपघातावेळी कारमध्ये असलेली मुलगी नेहा (वय २२) आणि पोलीस विभागातील एएसआय बसवराज सोना (वय ५१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Talikoti Car Crash News
Vijayapura Daylight Murder | विजापुरात भरदिवसा युवकाचा खून

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी चंद्रकांत नंदरेड्डी, सीपीआय महमद पसीउद्दीन, पीएसआय ज्योती खोत तसेच गुन्हे शाखेचे पीएसआय एस. एम. पडशेट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news