Uttarakhand Helicopter Crash : उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ६ ठार

अथणीतील उपनिरीक्षकासह कर्नाटकातील ५ जणांचा समावेश
Uttarakhand Helicopter Crash : उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ६ ठार
Published on: 
Updated on: 

चिकोडी, अथणी : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात शुक्रवारी खासगी हेलिकॉप्टर कोसळून सहाजणांचा मृत्‍यू झाला. जोशीमठाजवळील खोऱ्यात खराब हवामानामुळे हा अपघात घडला. पाचजण कर्नाटकातील असून, त्यात अथणी तालुक्यातील आरटाळ गावचे रहिवासी असलेल्या पोलिस निरीक्षकाचा समावेश आहे.

हिमांशू (वैमानिक), अरुण साळुंखे (सीसीबी पोलिस निरीक्षक वय ३८, आरटाळ, ता. अथणी) के. सुधीर (वकील, बंगळूर), शंकरेगौडा (वकील, बंगळूर), एच. एस. नटराज (वकील, बंगळूर), प्रताप (बंगळूर) अशी मृतांची नावे आहेत. साळुंखे हे त्यांचे मित्र सुधीर, शंकरेगौडा, एच. एस. नटराज आणि प्रताप यांच्यासोबत उत्तराखंड दौऱ्यावर गेले होते. बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन परतत असताना जोशीमठाजवळ त्‍यांच्‍यावर काळाने घाला घातला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.