

काशिनाथ सुळकुडे
चिकोडी : गणेशमूर्ती विसर्जना वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ट्रक घुसल्याने 8 जण ठार झाल्याची भीषण दुर्घटना हासन जिल्ह्यातील मोसळेहोसळी या गावात घडली आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यातील मयत पाच जण सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना , रस्त्याच्या दुसर्या बाजूने येणारी ट्रक अचानकपणे डिव्हायडरला धडकून यमाप्रमाणे हजारो लोक असलेल्या मिरवणुकीत घुसली. यामुळे घटनास्थळी चार जण ठार झाले तर आणखीन चार जण हॉस्पिटलमध्ये मरण पावले आहेत. तसेच 20 हून अधिक गंभीर जखमी आहेत. यावेळी ट्रक चालक भुवनेश याला नागरिकांनी चोपून काढले असून तोही जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री एच डी रेवना, विधान परिषद सदस्य सुरज रेवना, खासदार श्रेयस पटेल , निखिल कुमारस्वामी यांनी भेट दिली. सदर घटना पोलिसांच्या दुर्लक्षामुळे घडल्याचा आरोप एच डी रेवना यांनी केला आहे.
या भीषण दुर्घटने विषयी केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी ट्विट केले असून, सदर घटना दुर्दैवी असून बातम्या ऐकून फार दुख झालेले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो , त्यांच्या कुटुंबीयांना सहन करण्याची शक्ती देवो. जखमी लोक लवकरच बरे होऊ देत अशी प्रार्थना करतो. राज्य सरकारने जखमींना योग्य व चांगले उपचार देण्याची कार्यवाही करावी.