Transport Employees Protest | परिवहन कर्मचार्‍यांचे उद्यापासून आंदोलन?

CM Discussion Transport | मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा : एस्माचा इशारा
Transport Employees Protest
परिवहन कर्मचार्‍यांचे उद्यापासून आंदोलन?(Pudhari File Photo)
Published on
Updated on

बेळगाव : आपल्या विविध मागण्यांसाठी परिवहन महामंडळाचे कर्मचारी मंगळवारपासून (दि. 5) बेमुदत आंदोलन करणार आहेत. मात्र, कर्मचार्‍यांनी आंदोलन केल्यास शासनाने ‘अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा’ (एस्मा) लागू करत कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी (दि. 4) मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार आहे. तरीसुद्धा कर्मचार्‍यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. आंदोलन झाल्यास सार्वजनिक बसव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध परिवहन महामंडळांतील कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून आंदोलनाचा इशारा दिला असला तरी शासनाने आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधीच ‘एस्मा’ लागू केला आहे. शासनाने मागील अनेक वर्षांपासून परिवहन कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. वेतन, शासकीय कर्मचारी म्हणून नोंदणी, नोकरभरती या प्रमुख मागण्यासह इतर मागण्या केल्या आहेत. मात्र, अद्याप या मागण्यांकडे सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने परिवहन संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Transport Employees Protest
Belgaum News : आदेश नामपाट्यांपुरता, पण मनपाची मनमानी

यापूर्वी वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी परिवहन कर्मचार्‍यांनी दोनवेळा आंदोलन छेडले होते. त्यामुळे, सार्वजनिक बस वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. या काळात खाजगी वाहनांवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागले होते. दरम्यान काही कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर संप होणार की नाही, याचा निर्णय होणार आहे.

Transport Employees Protest
Belgaum Crime News | ‘त्या’ बालिकेच्या अज्ञात पालकांविरोधात गुन्हा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news