मुख्य न्यायाधीशांच्या हत्येची धमकी

मुख्य न्यायाधीशांच्या हत्येची धमकी
Published on
Updated on

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  पाकिस्तानस्थित बँक खात्यावर तातडीने 50 लाख रुपये जमा करा, अन्यथा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांची हत्या दुबईतील गँगकडून करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी मुरलीधर यांच्या मोबाईलवर अपरिचित क्रमांकावरून संदेश आला. त्याचबरोबर व्हॉटस् अ‍ॅपवरही धमकी देण्यात आली. यामुळे खळबळ माजली आहे. याप्रकरणी सेंट्रल पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तानमधील अलाईड बँक लिमिटेडच्या खात्यावर 50 लाख रुपये जमा करावेत. अन्यथा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महम्मद नवाज, न्या. एच. टी. नरेंद्रप्रसाद, न्या. अशोक जी. निजगण्णावर, न्या. एच. पी. संदेश, न्या. के. नटराजन आणि न्या. वीरप्पनवर यांची हत्या करण्याची धमकी देण्यात आली.

धमकीचा संदेश हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत आहे. त्यांनी पाकिस्तानमधील अलाईड बँकेचा खाते क्रमांक दिला आहे.
गेल्याच आठवड्यात बंगळूर पोलिसांनी पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करून बंगळूरसह हुबळी, उडपी, शिमोगा, मंगळूर, गुलबर्गा या संवेदनशील शहरात स्फोट घडवून आणण्याचा कट उघडकीस आणला होता. त्या पाच संशयित दहशतवाद्यांचे संबंध पाकस्थित लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी आहेत, असाही संशय आहे. त्यातच आता मुख्य न्यायाधीशांनाच धमकी आल्याने पोलिस यंत्रणा सजग झाली आहे.

   हेही वाचा : 

  • China school Gym roof collapses | चीनमधील शाळेतील जीमचे छत कोसळून १० ठार
  • हावडी मोदी ते नमस्ते ट्रम्प! दोन्ही कार्यक्रमाचा ट्रम्प यांच्या प्रचारात खूबीने वापर करण्यास सुरुवात!
  • छत्तीसगडमधील दोन जहाल नक्षल्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण | Naxalites surrendered

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news