

संकेश्वर : ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून कारची धडक बसल्याने झालेल्या अपघातात कारमधील एकजण ठार तर तिघेजण जखमी झाल्याची घटना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री घडली आहे.
रफिक रशीद पठाण (वय 45, ठाणे, वेस्ट मुंबई) असे मृताचे नाव असून जखमींना गडहिंग्लज येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. संकेश्वरहून बेडकीहाळ फॅक्टरीला ऊस भरून जाणार्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला? ? मुंबईकडे भरधाव जाणार्या कारची जोरात धडक बसली.
कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात कारमधील रफिक पठाण हे जागीच ठार झाले. जखमी आशरफ अलीमुल्ला खान, इमरान जैनुलहक्क, अमेश आयुबहक्क यांना? ? गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे.