

मकरंद द्रविड
सदलगा : सदलग्यातील शाळा आणि महाविद्यालयांना ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरण्यास फूटपाथची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत शाळांमध्ये जाऊन जागृतीही करण्यात आली होती; पण या फूटपाथचा वापर करण्याकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत असून, मेंढरे मात्र फुटपाथवरून ये-जा करताना दिसतात. त्यामुळे ‘गेली सांगून ज्ञानेश्वरी...’ याची प्रचिती सदलगा येथील फूटपाथवर येत आहे.
शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी फूटपाथची? ? निर्मिती केली आहे. कोट्यवधींचा निधी मंजूर करून पक्का डांबरी रस्ता बनविण्यात आला आहे. या मार्गावर अवजड वाहतुकीची वर्दळ अधिक असल्याने शालेय विद्यार्थ्यांना सोयीचे ठरण्यासाठी मुख्य मार्गावर फूटपाथची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सोय महत्त्वपूर्ण ठरली आहे.
विद्यार्थी जोखीम घेऊन रस्त्यावरून चालत जात असताना मेंढरासारखे मुके प्राणी मात्र आपल्या कृतीतून वेगळा संदेश देत आहेत, अशी चर्चा होत आहे.