

बेळगाव : सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालयांतील सुमारे सहा हजार अतिथी प्राध्यापकांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे अतिथी प्राध्यापकांनी सुवर्णसौध परिसरात आंदोलन सुरू केले असून, शुक्रवारी कोप्पळ जिल्ह्यातील लता पाटील नामक अतिथी प्राध्यापिकेने विषारी द्रव पिऊन आंदोलनस्थळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पात्रता नसणार्या प्राध्यापकांना नोकरीवरून कमी करण्याचा आदेश दिला आहे; मात्र सरकारने आम्हाला पुन्हा नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करत प्राध्यापकांनी सरकारविरोधात निदर्शने केली. त्यावेळी पाटील यांनी विषघगक द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आजुबाजूच्या सहकार्यांनी आणि पोलिसांनी रोखले.
राज्य सरकारी प्रथम श्रेणी अतिथी प्राध्यापक संघाने सुवर्णसौधसमोर शुक्रवारी आंदोलन सुरू केलेे. प्रथम श्रेणी महाविद्यालयांतील 20 ते 30 वर्षांपासून अतिथी प्राध्यापक सेवेत होते; पण यूजीसीच्या नियमावलीत प्राध्यापक बसले नाहीत. त्यामुळे सरकारने त्या प्राध्यापकांना कामावरून कमी केलेे. त्यामुळे काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली सर्वजण आहेत. आंदोलनस्थळी आमदार एस. व्ही. संकनूर भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी आंदोलक संतापले. आम्हाला आमच्या व्यथा तुम्हाला सांगायच्या नाहीत. मुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्र्यांना भेटावयास पाठवा, असा आग्रह त्यांनी धरला. या गोंधळातच प्राध्यापिकेेने आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना रोखत सुरक्षित ठिकाणी हलविले. 1995-96 पासून सरकारी प्रथम श्रेणी
महाविद्यालयांमध्ये अर्धवेळ काम करणारे प्राध्यापक आहेत. त्यांनी कायमस्वरूपी सेवा करण्याची मागणी केली होती. मात्र अनेकवेळा संघर्ष करूनही सेवेत कायम करून घेतले नाही. मात्र काही अटी घातल्या होत्या. मात्र पदव्युत्तर पदवीसह राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) किंवा कर्नाटक राज्य पात्रता परीक्षा (के-सेट) उत्तीर्ण केलेली असावी, अशी नियमावली यूजीसीने लागू केली. त्यामुळे या प्राध्यापकांना नोकरीला मुकावे लागले.
पोलिस बंदोबस्तात वाढ
आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्तात वाढ केली. डीसीपी नारायण बरमणीही आंदोलन÷स्थळी दाखल झाले. तुमच्या काय मागण्या आहेत, त्या शांततेत सांगा, आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत, त्यामुळे तुमचे आंदोलन शांतपणे करा, त्यामुळे तुमच्या मागण्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोचतील, असे सांगत आंदोलकांना शांत केले.
जिल्हाधिकार्यांची आंदोलन स्थळी भेट
सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालयांमध्ये अर्धवेळ काम करणार्या अतिथी प्राध्यापकांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भेट दिली. काही प्राध्यापकांनी गोंधळ गांधला होता. त्यांची समजूत काढून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले.