

बंगळूर : केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरोधात बंगळूरमधील संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक चंद्रशेखर यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय मंत्री एच. डी कुमारस्वामी, निखिल आणि सुरेश बाबू यांच्याविरोधात एफआयआर दाखल नोंदविला आहे. कुमारस्वामी आणि इतरांनी आपणास त्रास देण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.