

बेळगाव : दिराच्या घरी कार्यक्रमानिमित्त जेवण करण्यासाठी आलेल्या भावजय व तिच्या नातेवाईकांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नेसरगी पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये घडली. याप्रकरणी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रिती निलगार व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
आपल्या घरी कार्यक्रमाला आलेल्या शैला निलगार, प्रवीण निलगार आणि नवीन निलगार यांनी घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस प्रमुख गुळेद यांनी नेसरगी पोलिस स्थानकाला फोन करून योग्य तपास करून त्या कुटुंबियांना न्याय देण्याची सूचना केली आहे.