

बंगळूर : काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार शामनूर शिवशंंकराप्पा यांच्यावर दावणगिरी येथील कल्लेश्वर राईस मिल परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावळी अ.भा. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री, आमदार, काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सोमवारी पाहाटे 4 वाजता त्यांचे पार्थिव बंगळूरहून दावणगिरीला आणण्यात आले. प्रथम त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र एस. एस. बक्केश यांच्या निवासस्थानी त्यानंतर गणेश यांच्या आणि शेवटी तिसरे पुत्र मंत्री एस. मल्लिकार्जुन यांच्या निवासस्थानी कण्वकुप्पे येथे पार्थिव आणण्यात आले. शिवशंकराप्पा यांच्या मूळ निवास्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
सोमवारी (दि. 15) सायंकाळी दावणगिरी शहरात अंत्ययात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार एकाचवेळी या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते श्रध्दांजली वाहण्यात आली. सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिध्दगंगा मठातून सुमारे 100 विभूती पाठवण्यात आल्या होत्या. मठाचे अध्यक्ष सिध्दलिंग स्वामी यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले, शिक्षण क्षेत्रात आ. शामनूर यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या निधनाने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था सुरु केेल्या आहेत.
अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, आमच्या पक्षाचे ज्येष्ठे नेते आणि माझे मित्र शिवशंकराप्पा यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांनी नि:स्वार्थ भावनेने लोकांची सेवा केली. त्यांचे कार्य मोलाचे आहे. यावेळी मंत्री के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, आर. व्ही. देशपांडे, विरोधी पक्षनेते आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी, खासदार जगदीश शेट्टर, गोविंद करंदलाजे तसेच त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.