

बेळगाव : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानात नवरात्रोत्सव धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे. त्यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात आली असून सोमवारपासून (दि. 22) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी विविध पीठाधिश, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत यल्लम्मा मंदिरात घटस्थापना होणार आहे. त्यानंतर पुढील नऊ दिवस देवीची विशेष पूजा बांधण्यात येणार आहे. नवरात्रीनिमित्त देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक सौंदत्तीत दाखल होणार आहेत. भाविक तेल वाढविण्यासाठी आणि दर्शनासाठी गर्दी करणार आहेत. गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात 21 लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते. 1 ऑगस्ट रोजी आयुध पूजा होणार असून 2 रोजी सिमोल्लंघनाने नवरात्रीची सांगता होणार आहे. या सणासाठी देवस्थान विकास प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी केली आहे.
नवरात्रीत भाविकांना दर्शनावेळी कोणतीही अडचण होऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेची व्यवस्था असून प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. गर्भवती महिला, अपंगांसाठी बॅटरीवर चालणार्या वाहनांची सोय करण्यात आली आहे.
अशोक दुडगुंटी देवस्थान विकास प्राधिकरण, सचिव
वर्ष वाहिलेले तेल मिळालेला महसूल
2023 14,194 किलो 7,23,894 रुपये
2024 16,200 किलो 9,39,600 रुपये
नवरात्रोत्स चांगल्या प्रकारे व्हावा, यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही. त्यासाठी सर्वांनी प्रशासनालाही सहकार्य करावे.
विश्वास वैद्य आमदार, सौंदत्ती-यल्लम्मा