

सौंदलगा : आषाढी एकादशीनिमित्त येथील पुरातन विठ्ठल मंदिरामध्ये सकाळपासून दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सकाळी विठ्ठलाची पूजा करून मूर्तीला आकर्षक पेहराव करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. आरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौंदलगा परिसरात येथील विठ्ठल मंदिर पुरातन असून प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच शिळेत विठ्ठल-राई-रुक्मिणी अशा तिन्ही मूर्ती असून त्या मूर्तीवर सुबक नक्षीकाम केले आहे.
प्रत्येक बुधवारी तसेच प्रत्येक महिन्याच्या एकादशी दिवशी वारकरी व भाविक दर्शनासाठी येत असतात. आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत होते.