

निपाणी : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ हा सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या कष्टातून उभा राहिलेला संघ आहे. दूध उत्पादकांचे हित केंद्रस्थानी ठेवून गोकुळची ताकद आणखी भक्कम केली जाईल. सीमाभागासह कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना संघटित करून त्यांची मजबूत सेना उभी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दिली.
आपाचीवाडी येथील जागृत देवस्थान श्री हालसिद्धनाथ मंदिरात गोकुळच्या नूतन संचालकांसमवेत आ. सतेज पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी दर्शन घेतले. यावेळी श्री हालसिद्धनाथ चरणी नतमस्तक होत नूतन संचालकांच्या पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी आपाचीवाडी देवस्थान कमिटीच्यावतीने आ. सतेज पाटील यांच्यासह नुतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, गोकुळच्या यशामागे हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट आहेत. त्यामुळे संघाच्या प्रत्येक निर्णयामध्ये दूध उत्पादकांचा फायदा आणि त्यांचे आर्थिक हित यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. संघाच्या माध्यमातून उत्पादकांना अधिक सक्षम करण्याबरोबरच दूध व्यवसायाला स्थैर्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील. नूतन संचालकांनीही दूध उत्पादकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. संघ आणि उत्पादक यांच्यातील नाते अधिक दृढ करावे. सीमाभागातील दूध उत्पादकांना गोकुळशी अधिक मोठ्या संख्येने जोडून संघाची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जाईल, असेही आ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी यावेळी नूतन संचालक शशिकांत आनंदराव पाटील (चुयेकर), शशिकांत खोत, राजूबाबा आवळे, अभिजित तायशेटे, प्रा. किसन चौगले, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, राहुल बजरंग देसाई, विद्याधर गुरबे, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, श्रीमती अंजना केदारी रेडेकर, भाग्यश्री डोंगळे तसेच सत्यजित दिनकर जाधव यासह कुमार कापसे, स्वप्नील जाधव, बाबुराव खोत, तानशेंद खोत, गजानन खोत, दिलीप पाटेकर, धनाजी पोटले, कुमार कापसे, आदेश आबणे, कुमार खोत, योगेश पोटले, अमर चौगुले, प्रविण माळी बी.आर.माने, किसन पोटले, लक्ष्मण आबणे यांच्यासह सीमाभागातील दुध उत्पादक उपस्थित होते.