

रामनगर : लक्झरी कार व बसची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याची घटना अनमोड घाटातील अबकारी चेकनाक्याजवळ घडली. अपघातग्रस्त कार दोन कोटींहून अधिक किंमतीची असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाची बस (केए 25 एफ 3548) हुबळीहून गोव्याला चालली होती. तर कार (सीएच 01 बीएफ 0025) गोव्याहून बंगळूरच्या दिशेने येत होती. बंगळूरमधील व्यावसायिक एकटाच वाहन घेऊन जात होता. अनमोड तपासणी नाक्याजवळ दोन्ही वाहनांची धडक झाली.
सुदैवानेच या अपघातात कुणालाही इजा झाली नाही. मात्र, कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. बसच्याही दर्शनी भागाची हानी झाली आहे. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.