Belgaum Crime | मोठ्या भावाचा खून करून भासवला अपघात

मालमत्तेचा वाद : धाकट्या भावासह नातेवाईकाला दोघांना अटक
Belgaum Crime
मोठ्या भावाचा खून करून भासवला अपघात(Pudhari File Photo)
Published on
Updated on

बेळगाव : संपत्तीच्या वादातून धाकट्या भावाने मोठ्याचा विळ्याने वार करून खून करून तो अपघात भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सहा तासांतच बनावाचा पर्दाफाश करत धाकट्या भावासह नातेवाईक तरुणाला अटक केली. हुक्केरी तालुक्यातील कुरणी येथे हा प्रकार घडल.

संजू ऊर्फ पिंटू महादेव पाटील (वय 31, रा. कुरणी, ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे. त्याचा धाकटा भाऊ राकेश महादेव पाटील (वय 29) व नातेवाईक केंचाप्पा हुल्याप्पा पाटील (वय 21, दोघेही रा. कुरणी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ऊस तोडताना स्वतःचाच विळा लागून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याचे आधी भासवण्यात आले. परंतु, यमकनमर्डीचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी अवघ्या सहा तासांत छडा लावत दोघांना अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजू ऊर्फ पिंटू व राकेश या दोघा भावांमध्ये शेती व घराच्या वाटणीवरून वाद होता. काही महिन्यांपूर्वी राकेशचे लग्न व मालमत्तेसंबंधी वाद झाला होता. त्यानंतर संजूने भाऊ व आई-वडिलांना घराबाहेर काढले होते. तो एकटाच घरी राहात होता.

Belgaum Crime
Belgaum News: एकाच दिवशी दोन महिला लोकप्रतिनिधींचा मृत्यू

ऊस तोडताना विळा लागल्याचा बनाव

जखमी संजूला रूग्णालयात दाखल करताना ऊस तोडताना त्याचा विळा त्यालाच लागल्याचा बनाव राकेश व नातेवाईकांनी केला होता. हॉस्पिटलमध्ये तशी नोंद करून घेत उपचार सुरूही करण्यात आले. मात्र बुधवारी संजूचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news