

बेळगाव : माजी खा. प्रज्वल रेवण्णा याला झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर आम्ही बोललो तर ते राजकीय होईल. त्यामुळे या प्रकरणावर निजद किंवा भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देणे खूप महत्वाचे आहे, असे मत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवार दि. 2 रोजी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पत्रकारांनी प्रज्वल रेवण्णा याला बलात्कार प्रकरणात झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवरून विचारले असता डी. के. शिवकुमार म्हणाले, याबद्दल मला विचारण्यापेक्षा निजद व मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांना विचारले तर उचित ठरेल.
या प्रकरणावर निजदचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष व युवा मोर्चाच्या अध्यक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना उत्तर देऊ द्या. आम्ही ते काय म्हणतात ते नक्कीच जाणून घेऊ. याप्रकरणी आर. अशोक, नारायणस्वामी, सी. टी. रवी यांच्यासह प्रमुख भाजप नेते का बोलत नाहीत, असा प्रश्न मला पडला असल्याचे त्यांनी सांगितले.