Police Constable Arrested | कॉन्स्टेबलनेच आखला 1.15 कोटींच्या अपहरणाचा आणि दरोड्याचा कट

Police Constable Arrested | मंगळूरमधील १.१५ कोटी रुपयांच्या दरोडा व अपहरण प्रकरणात कारवार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल श्रीशैलला पोलिसांनी अटक केली असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.
Operation Sindoor ISI Agents Arrested
11 संशयितांना अटकFile Photo
Published on: 
Updated on: 

कारवार (पुढारी वृत्तसेवा):

१.१५ कोटी रुपयांचा दरोडा व अपहरण प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यालाच अटक करण्यात आली आहे. मंगळूर पोलिसांनी कारवार रहदारी पोलिस ठाण्यात कर्त्यत्वावर असलेल्या कॉन्स्टेबल श्रीशैलला अटक केली आहे.

Operation Sindoor ISI Agents Arrested
Karwar River Accident| कारवार हादरले! नदीत शिंपले काढण्यासाठी गेलेल्या 7 महिलांसह एकाच कुटुंबातील 10 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

दावणगिरीहून मंगळूरला नेण्यात येणाऱ्या पैशांची लूट करण्याच्या उद्देशाने सत्यनारायण नामक व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडून १.१५ कोटी रुपये लुटण्यात आले. सत्यनारायणाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मंगळूर पोलिसांनी तपास सुरू केला असता श्रीशैल हा या अपहरणामागे असल्याचे उघडकीस आले. त्याने कारवारमधील तरुणांचा वापर करून अपहरणाचा कट रचल्याचा संशय आहे.

कारवार तालुक्यातील किन्नर गावातील गणेश कोळंकर नामक तरुणाचा या गुन्ह्यासाठी वापर करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आधीच तीन संशयितांना अटक केली असून मुख्य संशयित मानला जाणाऱ्या गणेशचा शोध सुरू आहे. अटकेनंतर कारवार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीपान यांनी कॉन्स्टेबल श्रीशैल यांना निलंबित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.