Petrol Theft News: पेट्रोल सोन्याहून दुर्मीळ, चोरी सुरू!

हनुमान नगर परिसरात टोळी सक्रिय; सीसीटीव्ही चित्रणात हालचाली कैद
Petrol Theft News
Petrol Theft NewsPudhari
Published on
Updated on

बेळगाव : अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला करताच जगभराचा इंधन पुरवठा बाधित झाला आहे. इंधन गॅसटंचाई सुरू झाली आहेच, शिवाय पेट्रोल, डिझेल पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळेच की काय आता पेट्रोल चोरणारी टोळी बेळगावात सक्रिय झाली आहे.

हनुमान नगर परिसरातच पेट्रोल व डिझेल चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे सीसीटीव्ही चित्रणात कैद झाले आहे. टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. महत्त्वाचे म्हणजे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या घराच्या परिसरातच हे चोरटे फिरताना दिसत आहेत.

हातात मोठे प्लास्टिक कॅन व पाईप घेऊन हे चोरटे दुचाकींमधील पेट्रोल काढताना दिसतात. गुन्हेगार तोंडावर मास्क घालून आहेत, शिवाय त्यांच्या हातातत घातक शस्त्रेही आहेत. त्यांनी घरांसमोर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकींना लक्ष्य केले आहे. चार चाकी वाहनांच्या टाक्यातूनही पेट्रोल व डिझेल चोरण्याचा प्रयत्न ही सराईत टोळी करत आहे. या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news