Nipani Murder | प्रेमाला विरोध केल्याचे कारण : प्रेयसीच्या वडीलांचा मित्राच्या मदतीने काढला काटा!

गडहिंग्लजमधील कामगार खून प्रकरणाचा अखेर छडा ; दोघे गजाआड
मयत : महंमद खलीफ , ओरोपी युवराज मुन्नोळी व स्वप्निल रामपुरे
मयत : महंमद खलीफ , ओरोपी युवराज मुन्नोळी व स्वप्निल रामपुरे
Published on
Updated on

निपाणी : प्रेमाला विरोध केल्याने मुलीच्या वडीलांचा मित्राच्या मदतीने खून केल्याची कबुली प्रियकराने दिली आहे. महंमद समशेर खलीफ (वय ५२ रा. व्हळेहिटणी ता.गडहिंग्लज) या गडहिंग्लज साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराचा जांभियाचे वार करून डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून प्रियकर युवराज विरूपाक्ष मुन्नोळी (वय २२ रा. व्हळेहिटणी ता.गडहिंग्लज) याने खूनाची कबूली दिली आहे. यावेळी युवराजला मदत करणारा त्याचा मित्र स्वप्निल शिवानंद रामपूरे (वय २१, रा.निलजी, ता.गडहिंग्लज) यालाही निपाणी ग्रामीण पोलीसांनी शनिवारी दुपारी गजाआड केले.

दरम्यान या प्रकरणाचा अवघ्या चार दिवसात छडा लावल्याने जि.पो.प्रमुख के.रामराजन यांनी निपाणी ग्रामीण पोलीसांचे अभिनंदन केले आहे.यावेळी पोलीसांनी युवराज व स्वप्निल यांच्याकडून दुचाकी,रोख रक्कम,दोन किंमती मोबाईल व खुनातील हत्यार जप्त असा मुद्दे माल जप्त केला.

याबातची अधिक माहिती अशी की, मुख्य आरोपी युवराज मुन्नोळी याचे मृत महंमद समशेर खलीफ यांच्या मोठ्या मुलीवर गेल्या २-३ वर्षांपासून प्रेम होते. हा प्रकार मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर गावातील प्रमुखांसमोर पंचायतीमध्ये हा वाद मिटवण्यात आला होता. मात्र,यामुळे युवराजच्या मनात महंमद यांच्याबद्दल प्रचंड राग होता. त्यानंतरच्या काळात मृत महंमद हे गावातील एका व्यक्तीजवळ आले.

मयत : महंमद खलीफ , ओरोपी युवराज मुन्नोळी व स्वप्निल रामपुरे
Nipani crime news: गडहिंग्लज साखर कारखान्यातील कामगाराचा दगडाने ठेचून खून; नेमकं कारण काय?

यामध्ये मुख्य आरोपी युवराज हा गावातील सबंधित त्या व्यकीकडे कामाला होता,पण नंतर त्याने ते काम सोडले होते. त्यामुळे महंमद आणि संबंधित व्यक्ती दोघे मिळून आपल्याला मारहाण करण्याचा कट रचत आहेत, असा संशय युवराजचा मित्र स्वप्निलकडून व्यक्त करण्यात आला. या भितीपोटी मंगळवारी रात्री युवराज व स्वप्नील याने दुचाकीवरून खलीफ यांना पकडून नेऊन त्यांना तवंदी घाटमाथ्यावरील गावच्या रोडला लागून असलेल्या विहरीजवळ झुडपात नेले. तिथे त्यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने व मयत महंमद खलीफ यांनी अतिमद्यप्राशन केल्याचे पाहून आरोपी युवराज आणि स्वप्निल यांनी महंमद यांच्यावर जांभिया या शस्त्राने वार केले आणि डोक्यात दगड घालून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह घटनास्थळी पळ काढला.

दरम्यान बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर जि.पो.प्रमुख के.रामराजन,डीएसपी गोपाळकृष्ण गौडर,सीपीआय बी.एस.तळवार यांनी ठसे तज्ञ, श्वान व फाॅरेन्सिक पथकासह घटनास्थळी धाव घेऊन रितसर पंचनामा केला.

दरम्यान मयत खलीफ यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे व गावातून पसार असलेल्या संशयित मुख्य आरोपी युवराज याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी,हवलदार राजू दिवटे, रामगोंडा पाटील,शेखर असोदे यांनी पुणे येथे जाऊन एका लाॅजनधून संशयित आरोपी युवराज व स्वप्निल या दोघांना गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. शुक्रवारी दिवसभर कसून दोघांची चौकशी केली असता त्यांनी महंमद खलीफ यांच्या खुनाची कबुली दिली.

त्यानुसार दोघांवरही मयत महंमद यांच्या पत्नी निसिमा यांच्या फिर्यादीनुसार दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करून निपाणी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची निपाणी न्यायालयाने बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती सीपीआय बी.एस.तळवार यांनी दिली.

दुचाकी बसस्थानकात पार्क.. तर मोबाईल दुधगंगा नदीत

महंमद खलीफ यांचा खून केल्यानंतर युवराज व स्वप्निल या दोघांनी शांत डोक्याने निपाणीजवळील एका हॉटेलमध्ये जेवण करून दुचाकीवरून कोल्हापूर बसस्थानक गाठले. यामध्ये जाता जाता त्यांनी मृत खलीफ यांचा मोबाईल कोगनोळी जवळील दुधगंगा नदीत फेकून दिला. तर आपली दुचाकी कोल्हापूर येथील बस स्थानकात पार्क करून बसने पुणे गाठले. दरम्यान तपासासाठी गेलेल्या पथकाला दोघेजण मिळून आल्यानंतर दोघांच्या खिशात मंहमद खलीफ यांची कागदपत्रे व ओळखपत्र आढळून आल्याने तपास पथकाला या दोघांनीच खलीफ यांचा खून केल्याचे कळून आले.

पुण्यात हाॅटेलमध्ये काम.. गावात चहाटपरी

खलीफ यांचा खून करणारा युवराज हा व्यसनाधीन होता. त्याची उठबस ही व्यसनाधीन मित्राबरोबरच होती.यावेळी त्यांनी खलीफ यांचा खून करणाऱ्या युवराज याने मित्र स्वप्निल रामपुरे याला विश्वासात घेऊन दोघांनी कट रचून खलीफ यांचा निर्घृण खून केला युवराज हा तीन वर्षापूर्वी पुणे येथे एका हॉटेलमध्ये काम करीत होता तेथील काम सोडून त्याने दोन वर्षांपूर्वी गावात चहा टपरीचे दुकान काढले होते ते बंद करून तो असा व्यसनाधीन व टवाळखोर टोळक्यातून वावरत होता. यातूनच त्याने खलीफ यांच्या खुनाचा कट रचला अशी माहिती सीपीआय बी. एस.तळवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news